दिव्यांची अवस

  • 8.1k
  • 1.9k

दिव्यांची अवस आषाढ महिन्याच्या अमावास्येला ‘हरिता’ किंवा ‘हरियाली अमा’ असे संबोधतात. व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पाणथळ जागी जाऊन स्नान करावे. ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी ह्या व्रतात सांगितले आहेत. ह्या व्रतकार्यामुळे ‘पितर’ प्रसन्न होतात- हेच त्याचे फल आहे. ह्या दिवशी काही देवळांमध्ये पूजा बाधली जाते. तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने गाणी म्हणतात. हिंदू धर्मात पितरांसाठी भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा खास राखून ठेवलेला आहे. तरीदेखील प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला त्यातही दर्श अमावास्येला असे श्राद्ध करण्याची प्रथा आहे. ज्यांना ब्राह्मणभोजन घालणे शक्य नसेल त्यांनी शिधा स्वरूपात एखाद्या गरजूला दर महिन्यात ह्या तिथीला अन्नदान म्हणून धान्य दान करावे. असा संकेत आहे .