नागपंचमी

  • 7.8k
  • 2k

नागपंचमी हा नाग पूजनाचा दिवस. श्रावणातल्या ह्या दिवसात पावसामुळे सर्प बागेत, शेतात, अगदी घरातहीनिवा-याला येतात. तीन हजार वर्षांपासून नागदेवतेची पूजा माणूस करत आला आहे. शेतातल्या उंदराचा नायनाट करणारा हा प्राणी शेतक-याला आपला मित्र वाटतो. पुराणातही नागांचा उल्लेख आढळतो जसे की कालिया, शेष, अनंत, वासूकी, तक्षक, पद्म इत्यादी. आजच्या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जातेनागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचलित झाली असे मानले जाते. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी