भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १८)

  • 4.5k
  • 1.8k

सुप्री अशीच मधेच आठवणीत हरवून जायची. जेव्हा जेव्हा बाहेर जायचे, तेव्हा आकाश सोबतच असायची. त्याला अजिबात सोडायची नाही. जेवणाचे बघायला जाताना सुद्धा आकाश सोबतच असायची ती. म्हणून तर यावेळेस जेव्हा जेवणाची व्यवस्था करताना सुप्री पुढे होती. आकाशने शिकवून ठेवलं होतं ना, तसेच काही तिने विकत घेतलं गावातून. तिघी निघाल्या पुन्हा त्यांच्या जागी. अचानक संजनाचे लक्ष गेले एकीकडे. " कोमल... ती बघ... तशीच मूर्ती.." यावेळेस सुप्रीने सुद्धा पाहिली मूर्ती. तिघी त्या गणपतीच्या मूर्ती जवळ गेल्या. सुप्रीला अश्या मूर्तीबद्दल काहीच माहित नव्हतं. कोमल ,संजना शोधू लागल्या काही लिहिलं आहे का मुर्ती खाली. तर तिथेहि तीच गत.. भटक्याने काय लिहून ठेवलं होते, ते नव्हतेच