मैत्रीण भाग 5 - अंतिम भाग

  • 10.4k
  • 4.1k

मैत्रीण..... शेवटाकडे... आज स्नेहा कॉलेज ला येणार या विचाराने मी आनंदी झालो होतो. सकाळ पासून कॉलेज ला जाण्यासाठी माझी लगबग सुरू झाली होती. ती लगबग पाहून आमच्या मातोश्रींनी आम्हाला हटकलच, " काय रे... एवढी काय घाई...? कॉलेजलाच जायचे ना...?" " हो ग आई.... आणखीन कुठे जाणार आहे..?" मी कपाळावर आठ्या आणत विचारलं. " मग घाई कशाला करतोस..?" आईचे प्रश्न संपत नव्हते. तिची बॉलिंग सुरू होती आणि मी कसाबसा खेळत होतो. तिच्या तावडीतून कसातरी सुटलो आणि मी कॉलेज घाटलं. नित्या माझ्या आधीच कॉलेज ला आला होता. आम्ही दोघेही स्नेहाची वाट पाहत होतो. स्नेहा येईल की नाही याची धाकधूक लागली होती. आम्ही