आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणार

  • 8.4k
  • 1
  • 2.5k

आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणारआखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप फडफडले. दरवर्षी समेलनानंतर काहीतरी वाद उफाळून येतोच. हे साहित्य संमेलन तरी त्याला अपवाद कसे राहणार? साहित्य संमेलनाची सांगता होताच राजकीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मुद्दा चर्चेत आला. एका दृष्टीने बरे झाले. आणखी एका साहित्य संमेलनाची भर पडली. विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. साहित्य आणि राजकारण हा काही नवीन मुद्दा नाही. साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकारणी असावेत की नसावेत याबाबत आजवर उदंड चर्चा झाली आहे. असे असले तरी दरवर्षी त्यावर चर्चेचे गुऱ्हाळ का होते समजत नाही. साहित्य संमेलनाला शासनाकडून निधी घेतलेला चालतो मात्र साहित्यिक व्यासपीठावर राजकारणी चालत नाहीत हा एक प्रकारचा