निघाले सासुरा - 6

  • 9.5k
  • 3.8k

६) निघाले सासुरा! छाया पंचगिरीचे लग्न ठरले. तिला श्रीपालसारखा अतिशय सुयोग्य जीवनसाथी मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. 'इंतजार का फल मिठा होता है।' अशी काहीशी स्थिती छायाची झाली होती. ती खूप खुश होती. घरातही अत्यंत आनंदाचे वातावरण होते. बाईआत्या आणि मामा हे आल्यामुळे घरातील उत्साहाला आनंदाचे भरते आले होते. अलका-आकाशला स्वर्ग चार बोटे उरल्यागत् झाला होता. लग्नाच्या निमित्ताने करावयाची खरेदी, कार्यक्रम, कपडा खरेदी, खाण्याचे पदार्थ यासोबतच हौस- मौजीच्या वस्तूंचीही यादी तयार होत होती. अशा याद्यांवर चर्चा होत असताना प्रसंगी घनघोर चर्चाही झडत असे परंतु या चर्चा वादविवादापर्यंत जात नसत. कुणीतरी मधला मार्ग काढायचा आणि चर्चेला पूर्णविराम मिळायचा.