आज ती उठली आणि तीच अंग साथ देत नव्हत खूप त्रास होत होता, घर अस्ताव्यस्त पडलं होतं, आज शरीरात कणकण भरली होती, मनाशी ठरवलं तरी तिला तिची हालचाल करता येत नव्हती, कारण आता मन पण खूप थकलं होत, डोळ्याच्या कडेतून अश्रू वाहत होते आणि ते थांबत नव्हते, फक्त आवाज येत होता तो घडाळ्याच्या काट्याचा, उठायला जाताना अंगातून कळ गेली आणि मंजिरी पुन्हा जमिनीवर पडली, आता तिला स्वतःच अंग पण नीट सावरता येत नव्हतं, ती अशीच जमिनीवर पडून राहिली,हळूहळू हे असं आयुष्य कोणामुळे झालाय ह्याचा विचार करत होती तिला पहिले आई आणि बाबा आठवले, मग तिचा दादा खूप खूष होती मंजिरी