निघाले सासुरा - 7

  • 7.2k
  • 3.5k

७) निघाले सासुरा! चहा झालेला असताना बाई म्हणाली, "सरस्वती, आपण दुपारी आमंत्रण म्हणजे पत्रिका कुणाकुणाला द्यायच्या ती यादी करूया. वाटते गं, महिना आहे पण दिवस असे चुटकीसरशी निघून जातात..." सरस्वती त्यावर काही बोलणार तितक्यात दयानंद आणि दामोदरपंतांचे आगमन झाले."झाले बुवा झाले. एक मोठ्ठे काम झाले. सावधान बुक झाले. कुलकर्ण्यांचे समाधान झाले. आता पुढल्या तयारीला लागले पाहिजे." दामोदर बोलत असताना फोन खणाणला."हॅलो, मी कुलकर्णी बोलतोय.""मी तुम्हाला फोन करणार होतो. सावधान बुक झाले बरं का.""वा! वा! छान! परवाच्या दिवशी चांगला मुहूर्त आहे. तेव्हा म्हटलं साखरपुडा करुन घेऊया.""परवा? एवढ्या लवकर?" दयानंदांनी विचारले."मग काय झाले? अहो, आत्ताच श्रीपालचा फोन आला होता,