ऊर्मी

  • 8.2k
  • 2.2k

ऊर्मीवय 28, वर्ष पूर्णअविवाहित,ऊर्मीला, काल मी वाढदिवस साजरा केला. अगदी पहिल्यांदाच, या अगोदर वळीवाच्या पावसागत वाढदिवस केव्हा यायचा नि निघून जायचा हे कळायचंही नाही. आज पहाटेलाच मला जाग आली. बघते तर काय ? पाच वाजलेत... इथं आल्यापासून पहिल्यांदाच मी पहाटेला उठली होती. नाहीतर दररोज मी सातला उठायची. बेडवरून उठून माऊथब्रश हातात घेत मी डोळ्यावर पाणी शिंपडलं. नॅपकिनने हलकेच चेहऱ्यावर फिरवून केसांचा पुंजका बांधला. अंगावरील गाऊन योग्य तो व्हिवळत मी दार उघडलं. हलकीशी वाऱ्याची मंद लहर अंगाला शहारून गेली. प्रभात खरंच मनमोहक असते. घराबाहेरचं वातावरण अगदी शांत होतं. अजूनही थंडीच्या दिवसातील पहाट उजळायला थोडाफार अवकाश होता. चार दोन दुधाळ पक्षी घरट्यातून