मला काही सांगाचंय... - २६

  • 7.4k
  • 2.8k

२६. जाणीव अनिरुध्द बॉक्स जवळ बसून असतांना डोळे भरून आल्याने त्याचे दोन चार आसवं त्यावर पडली ... पटकन खिश्यातून रुमाल काढून त्याने ते आसवं पुसले अन ओल्या पापण्या हि रुमालाने पुसल्या ... मग अलगद बाहेर काढून त्यावर डाग तर पडला नाही ना म्हणून पाहण्यास त्याने जवळ घेतले . परत एकदा हलक्या हाताने ते वेष्टन साफ केले . निरखून पाहिल्यावर त्याला समजले की ते सोनेरी रंगाचे वेष्टन सर्व बाजूंनी चिटकवून पॅकिंग केले आहे ... अन त्याला प्रश्न पडला की आता काय करायचं ? आत काय ते उघडून पाहायचं कि नाही ? कुमारला काय वाटेल ? तो स्वतः भेट म्हणून कधीतरी देणार