भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २२)

  • 4.4k
  • 1.8k

" खोटं बोलतेस ना.. मला फसवण्यासाठी... " अमोलला वाटलं नेहमी सारखी मस्करी करत आहे. " नाही सर, खरंच... माझं प्रेम आहे एकावर... " सुप्री. त्यावर अमोलचा चेहरा पडला. " मी तुला गेले ६ महिने ओळखतो. एकदाही असं वाटलं नाही... तुझा कोणी बॉयफ्रेंड असेल असं. एकदाही भेटायला आला नाही... एकदाही फोन नाही किंवा तुझ्या तोंडून उच्चार नाही... प्रेम आहे त्याच्यावर ना... असतो कुठे तो... " अमोलचा स्वर बदलला. सुप्री काहीच बोलली नाही त्यावर. कुणीच काही बोलत नव्हतं. " सांग ना... कुठे असतो तो... " ," त्यालाच शोधायला आलो आहोत आपण... " सुप्रीने मान खाली करत उत्तर दिलं. " what !!! काय बोलते