सावर रे...!

  • 8k
  • 2.4k

सावर रे ...! आतातरी बदलायला हवं..! काल पेपरमध्ये एक बातमी वाचली, इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या. दररोज पेपर मध्ये आपण हे वाचत असतोच. पण, जेव्हा अशी घटना आपल्या जवळ, आसपास घडते तेव्हा त्यातलं गांभीर्य आपल्याला कळतं. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मनात विचार येतो, नवरा बायकोची भांडणं. दर वेळी आत्महत्येचं कारण हेच असेल, नाही सांगता येत. कर्ज किंवा पैशांचा प्रोब्लेम हे ही असू शकतं किंवा आणखी काहीही कारणं असू शकतात. कारणं काही का असेना, पण त्यावर आत्महत्त्या हे सोल्युशन नाही असू शकत. दोघेही सुशिक्षित कमवते. एखादं दुसरी मुलं असे आंनदी कुटुंब. आपल्या गावापासून, शहरापासून कोसो दूर येऊन नौकरी करत असतं.