बंदिनी.. - 15

  • 9.9k
  • 1
  • 4.1k

........ आज मन खूप खुश होतं ?.. पण वाईट ही वाटत होतं की तो माझ्यापासून एवढा दूर आहे.. ? दुसर्‍या दिवशी सकाळी मी आईकडून निघाले आणि माझ्या घरी आले.. सासू सासरे त्यांच्या मुलीकडे म्हणजेच विक्रांत च्या बहिणीकडे गेले होते.. ते संध्याकाळ पर्यंत परत येणार होते.. विक्रांत ऑफिस ला गेला होता.. माझी आजचा दिवस सुट्टी बाकी असल्याने मी घरातच होते.. मी माझी कामे आवरली.. जेवण वगैरे बनवलं.. आणि रिकामी बसले असताना मला अनय ची आठवण आली.. तसं बघितलं तर कालपासून तो जराही डोक्यातून गेला नव्हता माझ्या..! पण त्याने कॉल करायला सांगितलं होतं मला... त्याचा आवाज ऐकण्यासाठी माझेही कान आतुर झाले होते..