निघाले सासुरा - 9

  • 6.8k
  • 2.9k

९) निघाले सासुरा!"दयानंदराव, चला. छान झाले. त्रास संपला." "हो भाऊजी. पण खरेच फार त्रास झाला हो.""जाऊ दे ना. शेवट गोड तर सारे गोड. हा सारा योगायोगाचा खेळ आहे. किती कार्यक्रम झाले असतील रे?""भाऊजी, प्रत्यक्ष दाखविण्याचे पाऊण शतक आणि एकूण भेटाभेटीचे शतक झाले असेल .""रेकॉर्डच झाले म्हणायचे." दामोदरपंत म्हणाले."हो ना. भाऊजी, असे अनुभव आले ना की बस्स! विचारुच नका. वेगवेगळे नमुने भेटले बुवा! अनेकदा एकेकाचा राग यायचा, वैतागून जायचा जीव! परंतु आता काही प्रसंग आठवले ना, की हसू येते. अहो, एका ठिकाणी आम्ही जाण्यापूर्वी फोन करून गेलो. समोरून फोनवरच प्रश्नांच्या फेऱ्या झाडल्या गेल्या आणि नंतरच आम्हाला येण्याची परवानगी दिली. त्यानंतर चार-पाच तासांनी