मला काही सांगाचंय... - २७

  • 7k
  • 2.8k

२७. आभास इकडे दुसऱ्या शहरात - त्यांनी सोबतच चहा घेतला ... काही वेळ आज ऑफिसात दिवस कसा गेला ... ते तो तिला सांगत होता पण नेहमी सारखं तिचं आज त्या गोष्टींत मन रमत नव्हतं ... खरं तर तिचं मन हरवलं होतं ... कुठे ? तर कुमारच्या डायरीत .... ती त्याच्या समोर जरी बसून होती पण तिचं मन दूर कुठेतरी डायरीत जे काय आतापर्यंत तिने वाचलं होतं त्यातच अडकून होतं आणि आणखी पुढे काय ? यासाठी ती आतुर झालेली ... कदाचित म्हणूनच ती तिथं असूनही तिथं नव्हती तर जे काय वाचलं ते पुन्हा पुन्हा आठवून जणू ती स्मरण करू लागली ...