अष्टविनायक - भाग ३

  • 8.6k
  • 3.8k

अष्टविनायक भाग ३ याची कथा पुराणात अशी दिली आहे. पूर्वी ब्रह्मदेव सृष्टीरचना करत असतांना मधु व कैटभ या पराक्रमी दैत्यांनी ब्रह्मदेवांच्या कार्यात विघ्ने आणून त्यांना भंडावून सोडले. त्या त्रासाला कंटाळून ब्रह्मदेव विष्णुकडे आले. आणि त्यांनी या दैत्यांचा नाश करावा अशी प्रार्थना केली. भगवान विष्णू व मधु, कैटभ यांचे युद्ध झाले. पण विष्णुंना काही यश मिळाले नाही. ते मदतीसाठी शंकराकडे आले. आपल्या गायनाने त्यांनी भगवान्‌ शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरानी वर मागण्यास सांगितले. तेव्हा विष्णुंनी मधु,कैटभाची सर्व कथा सांगितली. भगवान शंकर म्हणाले, श्रीविनायकाला प्रसन्न करून घेतले असतेस तर तुला यापूर्वीच जय मिळाला असता. नंतर विनायकाला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान शंकरांनी विष्णुला षडाक्षरी