मला काही सांगाचंय.... - २८

  • 8.3k
  • 1
  • 2.6k

२८. गतकाळ ती बराच वेळ बिछान्यावर पाठ टेकवून बसलेली होती आणि दुपारी घाई घाईत काम केल्याने तिला जरा थकवा जाणवत होता . तिने एकावर एक अश्या दोन उश्या ठेवल्या , जरा खाली सरकून तिने त्यावर मान टेकवली . डायरी हातात घेऊन वाचतांना बरोबर उजेड येत आहे कि नाही म्हणून तिने एकदा वाचून पाहिलं आणि हवा तितका प्रकाश डायरीच्या कागदांवर पडत नसल्यामुळे तिने तो नाईट लॅम्प जवळ ओढला . आता ती पूर्ण बिछान्यावर झोपून , किंचित मान वर ठेवून , दोन्ही हाताचे कोपर गादीत रोवून , हाताने डायरी नीट पकडून पुढे वाचायला लागली ... कुमारने डायरीत समोर लिहिलं होतं