फादर्स डे...! वेळ संध्याकाळी सातच्या आसपास. पुण्यातील गजबजलेलं आणि रहदारीचं ठिकाण, हडपसर गाडीतळ. बस स्टॉप वर बसची वाट पाहत एक कुटुंब उभं होतं. आणि त्यांच्याबरोबर एक तीन - साडेतीन वर्षांचं निरागस लेकरू साबणाच्या पाण्याचे फुगे सोडत आनंद घेत होतं. मामा मामीकडे जायचं म्हणून ते पोर खूपच खुश दिसत होतं. बरोबर आणलेली चकली संपली होती. आई पुन्हा स्वीट होम मधून चकली अन मिंटचे पॅकेट घेऊन आली. पोर एकदम खुश झालं. बस आली तसं बापाने पोराला उचलून पटकन आतमध्ये जाऊन जागा पकडली. पोराला सीटवर बसवलं अन सासूलाही बसायला सांगितलं. तसं ते पोर रडवेल्या चेहऱ्याने त्याला