निघाले सासुरा - 12

  • 6.7k
  • 2.7k

१२) निघाले सासुरा! दामोधरपंत आणि बाई यांनी शेवटी आकाशच्या मदतीने केळवणाचा घाट घातलाच. त्यादिवशी सारे पंचगिरी कुटंबीय, श्रीपाल यांचेसह दामोदर आणि बाई हॉटेल अमृतमध्ये जेवायला गेले. अत्यंत प्रसन्न वातावरणात जेवणे सुरू होती. केळवण हॉटेलमध्ये असले तरीही बाईंनी पंचगिरी कुटुंबीय आणि श्रीपालच्या ताटाभोवती फुलांची सुंदर रांगोळी काढून छान सुवासिक अगरबत्ती लावली होती. आकाशने मोबाईलवर सुरुवातीला फोटो काढले. जेवताना आकाशने अचानक विचारले,"मामा, लग्नामध्ये ती कानपिळी काय असते हो?""वधूचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो आणि नवरदेव त्याला बक्षीस देतो." दामोदर म्हणाले."आपून को भी एक चान्स है तो। भाऊजी, बघा हं. मला माझ्या पसंतीचा ड्रेस हवाय नाही तर..." असे म्हणत आकाशने जोरात कान पिळण्याचा