भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २८)

  • 5k
  • 2k

अमोलने तर पहाटेच प्रवास सुरु केलेला... पहाटेच्या ६ :१५ च्या सुमारास तो निघाला. कधी चालत , कधी धावत... त्याला जलद पोहोचायचे होते. कालच्या पावसात ते सर्व नक्की थांबले असणार, त्यामुळे ते आणखी पुढे जाण्याच्या आधीच गाठूया त्यांना, असं ठरवलं त्याने. पोहोचला ही पुढच्या गावात. गाव अजूनही झोपत असावं... कोणीच दिसतं नव्हतं. तरी तो पुढे चालत गेला. एका ठिकाणी , २-३ माणसं दिसली त्याला. धावत पोहोचला त्यांकडे. " अहो... तुमच्या गावात .. कोणी शहरातली माणसं ... पाठीवर मोठ्या बॅगा असलेले आले आहेत का... " ," हो... आहेत ... कालपासुन थांबली आहेत तिथे... " एका दिशेला त्याने बोट दाखवलं. त्या दिशेने धावत