दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या आज काय तर म्हणे प्रॉमिस डे. शुद्ध मराठीत वचन देण्याचा दिवस. रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, किस डे, लव्ह डे हे दिवस साजरे करून नेमके काय साधले जाते कोणास ठाऊक? खरे तर या साऱ्या मागे प्रियकर व प्रियसी यांची प्रेमाची सुप्त भावना दडलेली आहे असे म्हटले तर त्यात वावगे काहीच नाही. बघा ना हे शब्द जरी नुसते उच्चारले तरी आपल्या मनात दोन जीवांच्या प्रेमाचेच विचार येतात. आई, वडील, मित्र, नातेवाईक, सहकारी यांचा विचार आपण का करत नाही. असे डे साजरे करायला विरोध असण्याचे कारण नाही कारण तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. विरोध झाला तरी