अष्टविनायक - भाग ६

  • 7.5k
  • 3.2k

अष्टविनायक भाग ६ १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयन लोकाकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. चिंतामणी हे श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास वारंवार येत असत . त्यांनी आपल्या काळात या मंदिराचा सभामंडप बांधला आणि मंदिराचा विस्तार केला .देवाचे सानिध्य लाभावे म्हणून देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता