समाज आणि काम

  • 5k
  • 2k

वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही म्हातारी इथं अशी रस्त्यावर का? अशी दीनवाणी…. अंगावरचं लुगडं ते तसचं, दोन दिवस झाले….. अंगाला पाणी नव्हतं…. डोक्याला तेल नव्हतं, त्या हमरस्त्यावरुन येणारा-जाणा-याकडे हात पसरवून एक-दोन रुपयांसाठी तातकळत ती उभी होती, लोक जी काही भीख देत होते त्या पैशांत दिवसातून दोनदा वडापाव खाऊन झाले होते,