मला काही सांगाचंय.... - ३८ - १

  • 6.9k
  • 2.6k

३८. बहर - निसटून गेलेले क्षण ती तिच्या शहरात पोहोचली , लगबगीने चालत ती घरी आली , आवाराचे गेट उघडून ती अंगणातील तुळशी वृन्दावनाजवळ थांबली . हँडबॅग मधून चावी काढून तिने कुलूप उघडलं नंतर दरवाजा ... चावी काढतांना हातात घेतलेली हँडबॅग तिने हॉलमध्ये आल्याआल्या टेबलवर ठेवली , किचनमध्ये जाऊन तिने थंडगार पाण्याची बॉटल बाहेर काढली आणि ती बेडरुममध्ये शिरली , बेडवर बसून ती दोन चार घोट पाणी प्यायली , तिने साडीच्या पदराने चेहऱ्यावर आलेला घाम पुसला आणि पंखा सुरु केला , पटकन मागे वळून ड्रेसिंग टेबल जवळ आली आणि तिने डायरी हातात घेतली ... ती वाचायला सुरुवात करणार तोच