मला काही सांगाचंय.... - ३८ - २

  • 6.5k
  • 2
  • 2.4k

३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 2 पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला , नवरात्र उत्सव आला होता .. दसऱ्याच्या दिवशीची गोष्ट , मी सायकल धुवून पायदळ तिच्या घरासमोरून जात होतो , ती समोर आली , आज काहीतरी वेगळपण तिच्यात दिसत होतं मला सेकंदाचाही वेळ लागला नसावा तिने दोन लांबलचक वेण्या घातल्या होत्या आणि तिला खरंच खूप छान दिसत होत्या म्हणून ती आवाज देण्याची वाट न पाहता मी स्वतःहून तिथं थांबलो , तिने अंगणात रांगोळी काढली होती आणि रांगोळीचं ताट हातात घेऊन ती काढलेल्या कलाकृतीला पाहत होती , मी तिला आवाज दिला अन तिला मला वळून पाहिलं ..