३९. सोबती - जुने कि नवे - 2 या अनुभवातून मी जरा सावरलो होतो , तिच्यावर असलेल्या प्रेमाच्या आहारी जाऊन मी काही वेळाकरिता भरकटलो होतो पण आता मला जाणीव झाली होती की ती जितकी महत्वाची होती तितकीच घरच्यांची माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता होणे हे सुध्दा महत्वाचं होतं ... म्हणून मी मनातलं प्रेम जोवर मी माझं ध्येय साध्य करत नाही तोवर व्यक्त करायचं नाही असं ठरवलं . तोपर्यंत फक्त जे जस आहे तसंच सुरु ठेवावं हेही स्वतःला समजावलं ... सुरुवातीला तिला भेटायचं टाळण खूप कठीण होतं , सारखं मनात यायचं तिला पाहावं , तिच्याशी गप्पा मारत बसावं अस ... कितीही