मला काही सांगाचंय.... - ४० - २

  • 8.4k
  • 4
  • 2.5k

४०. एक घाव आणखी - 2 इकडे रुग्णालयात --- जेव्हा जवळपास ६:३० वाजलेले , डॉक्टर देवांश वैद्य आणि नर्स यांनी कुमारला तपासलं , त्याच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली हे त्यांना कळलं आणि त्याचा त्यांना आनंदही झाला पण तो आनंदाचा क्षण कुमारच्या आई वडील , भाऊ , नातेवाईक , मित्र यांना सांगण्याआधीच जागीच विरला , एका चिंतेचा तिथे उगम झाला . सुरुवातीला डॉक्टर वैद्य यांना विश्वासच बसेना जे अनुभवास आलं ते इतकं अनपेक्षित होत की त्यांनी पुन्हा पुन्हा ती गोष्ट खरी आहे याची खात्री करून घेतली आणि लवकरात लवकर कुमारच्या कुटुंबियांना या गोष्टीची कल्पना देणे आवश्यक आहे हे जाणून आधी