निघाले सासुरा - 14

  • 6.1k
  • 2.5k

१४) निघाले सासुरा! सीमांतपूजनाचा दिवस उजाडला. तशी वेगळीच घाई सुरू झाली. सामानाची बांधाबांध, पत्रिकेसह इतर कामांवर शेवटचा हात फिरविणे, आलेल्या पाहुण्यांची विचारपूस, येत असलेल्या पाहुण्यांचे स्वागत अशी धांदल सुरू असताना दामोदरपंत म्हणाले, दयानंद, पाहुण्यांना म्हणजे कुलकर्णी परिवाराला आमंत्रण घेऊन जावे लागेल हं. भाऊजी, गावातच लग्न आहे. तेव्हा... तरीही निमंत्रण द्यावे लागेल. तशी परंपराच आहे. अरे, माझ्या परिचिताकडे गावातच लग्न होते म्हणून त्यांनी वरपक्षाकडे निमंत्रण दिलेच नाही. शिवाय वराच्या घराजवळ ते मंगल कार्यालय होते. वधूपक्षाचे सारे बिऱ्हाड कार्यालयात पोहोचले. वरपक्षाकडील मंडळी येण्याची सारेजण वाट पाहत होते. रात्रीचे नऊ वाजले परंतु वरपक्षाकडील लोक येण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हते. तेव्हा कुणीतरी म्हणाले, की फोन