निघाले सासुरा - 15

  • 5.6k
  • 2.5k

१५) निघाले सासुरा! लग्नाचा दिवस उजाडला तशी वेगळीच लगीनघाई सुरू झाली. चहा, पाणी, आंघोळी अशा कामांनी वेग घेतला. नवरीला हळद लावण्याची तयारी सुरू झाली परंतु वाट होती नवरदेवाकडून येणाऱ्या 'उष्टी हळद'ची. आत्या, उष्टी हळद हा काय प्रकार आहे? अलकाने विचारले. अग, तिकडे श्रीपालला तेल, उटणे, हळद लावून आंघोळ घातली जाणार आहे. त्याला तेल-हळद लावून झाली की ती हळद आपल्याकडे येईल आणि मग तीच हळद छायाला लावायची असते. असे होय का? मला वाटले उष्टी हळद म्हणजे आधी नवरदेव थोडी हळद खात असेल आणि मग त्याने तोंड लावलेली हळद नवरीला आणून लावत असणार. खाल्ल्याशिवाय ती उष्टी होईलच कशी नाही का? अलकाने विचारले. ये चूप ग.