भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १

(16)
  • 14.9k
  • 2
  • 8.8k

मे महिन्याचा शेवटचा आठवडा,... तारीख.. कोणाला माहित.... तरीही काय फरक पडणार होता तारीख जाणून. ना तारीख माहित , ना वार .... त्यात सकाळ होतं होती. आकाश तर आधीच जागा झालेला. घड्याळात न बघताच हल्ली त्याला वेळेचाही अंदाज बांधता यायचा. यावेळेसही त्याने अंदाज लावला. पहाटेची ६:१५ ते ६:३० ची वेळ... डोंगर -दऱ्यात रात्रीची वस्ती असली कि सूर्य देवाची पहिली किरणे अंगावर घेणं आलेच. आकाश तर कधी पासून सूर्य देवाची वाट पाहत होता. उंच ठिकाणी उभा होता... गेल्या १०-१५ मिनिटांपासून. आज उशीरच झाला ना.... सूर्यदेवाला... आकाश मनातल्या मनात बोलला. आभाळात नजर फिरवली त्याने. समोरचे आभाळ रिकामंच होतं. पाठीमागे