भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ३

(11)
  • 5.9k
  • 2.8k

पुढच्या दिवशी , ऑफिस सुटल्यावर नेहमी सारखे हे तिघे एकत्र निघाले. घरीच जाणार होते, वाटेत सुप्रीने थांबवलं. " आकाश ... कॉफी घेऊया का ... छान थंड हवा आहे , मूड झाला आहे माझा कॉफीचा ... " ," मूड झाला तर चलो .... " आकाश सुद्धा तयार झाला. संजना होतीच सोबत. नेहमीच्या ठिकाणी आले. बसले थोडावेळ. यांचे टेबल सुद्धा ठरलेले. संजनाने त्यातल्या त्यात एक पुस्तक शोधून काढलं. ते वाचत बसली एका कोपऱ्यात. या दोघांना मोकळीक म्हणून. कॉफी साठी वेळ होता. आकाशचे लक्ष पुन्हा आभाळाकडे लागलं होतं. आणि सुप्री त्याच्याकडे पाहत होती. गुपचूप तिने , काल संजनाने दिलेला पेपर आकाशच्या पुढयात ठेवला. त्याचे