भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १३

  • 5k
  • 1
  • 1.7k

कादंबरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पूजा पुढे सांगू लागली. " एक दिवस काय झालं, बाबा अगदी शुल्लक कारणावरून चिडले माझ्यावर. त्यात मधेच भावाचा विषय निघाला. तो किती चांगला आहे , मी कशी नको आहे ... का कस माहित नाही ते .. पण त्यांचा माझ्यावरचा राग बाहेर आला. त्या बोलण्यातून , मी त्यांना किती नको आहे , ते सांगून टाकलं त्यांनी. आईने माझ्या बाजूने काहीतरी बोलवं अशी अपेक्षा होती. तीही काहीच बोलली नाही. मी कोणासाठी बोलू आणि काय बोलू , माझ्याकडे विषयच राहिला नाही. त्यादिवसापासून एक विचित्र अबोला सुरु झाला घरात. आई-बाबा-भाऊ आणि बाजूला मी वेगळी. ते तिघेच बोलायचे एकमेकांशी. माझ्याकडे