तुम्ही काय करता?

  • 6.9k
  • 2.2k

ही एक दुःखी पुरुषाची कहाणी आहे. त्यातल्या त्यात निव्रत्त झालेल्या पुरुषांच्या हाल फार खराब असते. जसे आईने केलेल्या काम मुलांना दिसत नाही किंवा कळत नाही तसेच नवर्याने केलेल्या काम बायकोला दिसत नाही, कळत नाही किंवा समजत नाही. अरविंद एक निव्रत्त प्राचार्य आहेत ७२ वर्षाचे. मेकॅनिकल इंजिनिअर असून २० वर्ष ६/७ कंपन्या मधे सर्विस करून नंतर इंजिनिअरिंग कालेज मधे अध्यापक म्हणून १७ वर्ष मुलांना शिकवले. आता डोंबिवलीत स्वतःच्या फ्लॅट मधे राहतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा. दोघेही चांगले शिक्षण घेऊन चांगले कंपनीत चांगल्या पदावर आहेत. दोघांच्या लग्न झाले आहे. देवाने त्यांना एकेक मुलगा दिला आहे. आपापल्या संसारात रमले