एक दिन औषधाविन

  • 4.6k
  • 2.1k

*एक दिन औषधाविन !* नेहमीप्रमाणे बबनराव टीव्ही लावून बसले होते. चोवीस तास ताज्या टवटवीत बातम्या देणाऱ्या एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर उड्या मारताना ते स्वतःशीच पुटपुटत होते,'काहीही विशेष बातमी नाही. दुपारपासून प्रत्येक वाहिनीने जणू एकच एक बातमीचे रवंथ करण्याचा ठेका घेतलाय. आम्हाला तेच तेच ऐकून कंटाळा येतोत रे पण तुम्हाला तेच तेच शंभरवेळा ऐकवताना मळमळत नाही का? सेवानिवृत्त लोकांना... ज्येष्ठांना बातम्यांचा आधार यादृष्टीने टीव्हीसमोर बसावे तर तीच तीच क्षणचित्रे पाहावी लागतात. काय करणार? दुसरा इलाजही नाही आणि पर्यायही नाही...' तितक्यात एका वाहिनीवर एक ब्रेकिंग न्यूज