एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 2

  • 7.1k
  • 3.9k

अजिंक्य बाथरूमकडे जाऊ लागला आणि त्याला स्नेहाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ..तो तसाचं धावत तिच्याकडे परतला ..काही अंतरावरूनच तो आपल्या पिल्लुला हसवन्याचा प्रयत्न करू लागला आणि तीही त्याच्याकडे बघून हसू लागली ..अजिंक्यकची नौटंकी पाहून सर्व हसायला लागले होते त्यामुळे तो थोडा शरमला पण पिल्लूला हसताना पाहून मात्र तिच्या त्या निरागस हसण्याची एक वेगळीच मजा मला त्याला अनुभवास येत होती आणि त्याने सर्वांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली ..." अरे बापरे !!! किती गोड हसतय ना माझं पिल्लू !! माझ्याकडे येणार आहेस तू ? " , अजिंक्य बोबड्या शब्दात म्हणाला ..तिने हे ऐकताच हात समोर केले आणि अजिंक्य तिला घेऊन अंगणात गेला