एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 4

  • 7.6k
  • 4k

मूवी पाहून झाली होती आणि आता दोघांच्याही पोटात कावळे ओरडू लागले ..अजिंक्यने सर्व प्लॅंनिंग केली होती त्यामुळे त्याने जेवायला जाण्यासाठी लगेच गाडी काढली ..गाडी हळूहळू शहर ओलांडून गावाकडे जाऊ लागली ..अजिंक्य मृणालला भरपूर वेळा मोठं - मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला घेऊन गेला होता पण त्या स्थळाबद्दल मृणालला काहीच माहिती नव्हतं त्यामुळे ती अजिंक्यला त्याबद्दल विचारू लागली.. अजिंक्यला तिला सरप्राइज द्यायचं असल्याने आज तो काहीच बोलत नव्हता आणि ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली ..अजिंक्यने देखील काही पाहिलंच नाही असद दाखवून गाडी चालविण्याकडे लक्ष केंद्रित केलं ..हळूहळू एक - एक गाव ओलांडत ते त्या स्थळापर्यंत पोहोचले ..अजिंक्य गाडी पार्क करायला गेला