एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 6

  • 6.2k
  • 3.1k

अजिंक्यच्या तोंडून पहिले शब्द निघाले , " रिया तुमच्यात काय बोलणं झालं ? " ..त्याच्या अचानक प्रश्नाने रियाच लक्ष त्याच्याकडे गेलं ..त्याला तिच्याकडे पाहण्याची भीती वाटत होती म्हणून त्याने गाडी चालवितच प्रश्न विचारला ..मधातच त्याने एकदाच तिच्याकडे लक्ष दिलं आणि ती तेव्हाच बाजूला बघू लागली ..अजिंक्यला शंका येऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली , " सॉरी अजिंक्य पण आमचं सिक्रेट आहे ते ..त्यामुळे ते मी तुला सांगू शकणार नाही .." त्याला तिचा राग आला होता पण तरीही राग आवरत तो गाडी चालवू लागला..पुन्हा एकदा गाडीत निरव शांतता निर्माण झाली . अजिंक्यला ते वातावरण नकोस