पुन्हा एकदा मुंबई ...हळूहळू मागे एक - एक इमारत जाऊ लागली आणि अजिंक्य - मृणाल दोघेही आठवणींच्या जुन्या क्षणात हरवू लागले ..जस - जस ऐअरपोर्ट जवळ येऊ लागलं तस - तसा मृणालचा चेहरा बदलू लागला ..ती शांत होती पण मनात कुठेतरी भीतीने घर करून सोडलं होत ..कुणीतरी पुन्हा या शहरात आपल्याला ओळखेल आणि आपलं वर्तमान पूर्णतःच बदलून जाईल याची तिला भीती वाटत होती ..बऱ्याच प्रयत्नानंतर तिला जीवनसाथी , कुटुंब , आणि तिचाच अंश लाभला होता आणि त्यापासुन दुरावणे म्हणजे आयुष्याचा शेवटच होता ..तिच्या चेहऱ्यावर भीतीचे जाळे पसरले होते आणि अजिंक्यने तिच्या हातावर आपला हात ठेवला ..त्यात त्याचा विश्वास होता