एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 10

  • 6.1k
  • 1
  • 2.7k

अजिंक्य आणि काकू आश्रमाकडे निघाले तेव्हा अंधार पडला होता ..हळूहळू गुलाबी थंडीही वाढू लागली होती ..काकू दिवसभर थकल्या असल्याने त्यांचा कारमध्येच डोळा लागला तर अजिंक्य निवांत गाडी चालवू लागला ..काहीच क्षणात गाडी आश्रमाजळवळ पोहोचली ..अजिंक्यने गाडी पार्क केली आणि काकूंना उठवू लागला ..काकू आपले डोळे चोळत उठल्या आणि समोरच दृश्य बघून थक्क झाल्या .आज संपूर्ण आश्रम लायटिंगने सजवलं होत ..आश्रमाकडे बघून त्यांना स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि त्या एक एक पाऊल समोर टाकू लागल्या ।.काकू समोर जाऊ लागल्या आणि मृणाल व निशा महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी परिधान करून समोर आल्या ..त्यांच्या हातात फुलांनी सजवलेली आरतीची थाळी होती ..काकू