एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 12

  • 5.6k
  • 2.6k

रियाने फोन रिसिव्ह केला आणि मृणालची झोपच उडाली ..एवढ्या रात्री ती अजिंक्यच्या रूममध्ये कशी आणि तिचा बोललेला प्रत्येक शब्द खरा होता का ..की ती माझ्याशी खोट बोलली असे बरेच प्रश्न तिला सतावू लागले ..अजिंक्यवरचा विश्वास तिळमात्रही कमी झाला नव्हता पण रियावर अजूनही तिचा पूर्ण विश्वास बसला नव्हता ..त्यामुळे ती साशंक होती ..गेले वर्षभर तिने आपला भूतकाळ घरच्यांपासून लपवून ठेवला होता आणि त्याच ओझं तिला आतूनच तीळतीळ तोडत होत ..अजिंक्यच्या साथीने तिने स्वताला कसतरी सावरलं होत पण आता आपल्यापासून अजिंक्यच दूर जाईल अस तिला वाटू लागलं आणि गेल्या वर्षभरात लपवून ठेवलेल्या सत्याने पुन्हा एकदा मनात उडी घेतली ..अजिंक्य माझ्यापासून