कथा मोबाईलच्या रेंजचीआप्पासाहेब तशी गावातली मोठी आसामी. बरीच वर्षे धुरकट वाडीचे सरपंच पद सांभाळत होते. माणूस साधा भोळा पण मोठा कामाचा त्यामुळे गावाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास. आप्पासाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा. त्यांचा शब्द म्हणजे एक प्रकारची देववाणीच होती. धुरकट वाडीचा जो काही विकास झाला त्याचे समध श्रेय आप्पासाहेबांना दिल जायचं. गावात रस्त्याचा व खड्ड्याचा मेळ कधीच लागला नव्हता. गावातली माणसं एका सरळ रेषेत कधी चालताना दिसतच न्हवती. जो तो एकदा हिकडं एकदा तिकडं हेलकावे खातच चालत होता. बाया, बापय, म्हातारी, कोतारी, तरणी समध्यांची आवस्था एक सारखीच होती. त्यामुळे सारा गाव वैतागला होता. आप्पासाहेबांनी मनावर घेतलं अन गावातील रस्ते अगदी तालुक्यापर्यंत