नर्मदा परीक्रमा - भाग ६

  • 12k
  • 5.7k

नर्मदा परिक्रमा भाग ६ परीक्रमेदरम्यान वेगवेगळ्या गावात असणार्या मंदिरांची आणि घाटांची त्याबद्दल असणार्या धार्मिक कथाची ओळख होत जाते. एकूण बारा घाट आहेत.सर्व घाट खुप साफ व सुंदर आहेत . नदीचे पाणीही सगळीकडे निर्मळ आहे . नर्मदा परिक्रमा चालू केली की नर्मदेला मैय्या असे संबोधले जाते . ओमकारेश्वरला जाताना वाटेत मुक्ताईनगर मध्ये संत मुक्ताबाईंचे मंदिर आहे .मुक्ताबाई त्या ठिकाणी कडाडणाऱ्या वीजेसोबत लुप्त झाली अशी आख्यायिका आहे . नेहेमी आपल्याला दत्त त्रिमूर्ती स्वरूपात दिसतो पण बडवानी येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे . शहादा येथून पुढे जाताना वाटेत प्रकाशा येथे पुष्पदन्तेश्वर म्हणजे महादेवाचे देऊळ आहे . या ठिकाणी शिवमहिम्नाची रचना केली गेली आणि