नर्मदा परिक्रमा भाग ७ परिक्रमा तीन प्रकारे करता येते ,एक म्हणजे पैसे सोबत घेऊन वहानाने ,दुसरी अर्धी पायी आणि अर्धी किनार्यांने आणि तिसरी म्हणजे पूर्ण पायी . पूर्ण पायी करताना सदाव्रत म्हणजे डाळ ,तांदूळ व शिधा भिक्षा मागून शिजवून खाणे . हे सदाव्रत नर्मदा किनार्यावरील शेतकरी आदिवासी व नावाडी बांधव देतात,ज्यांना स्वतःला उद्याची भ्रांत असते . दरवर्षी साधारण एक लाख भर लोक परिक्रमा करतात . त्यातील वीस ते पंचवीस हजार पायी परिक्रमा करतात . ही एकच यात्रा अशी आहे जी तुम्ही एक पैसाही सोबत न घेता करता येते . तुमच्या सर्व खर्चाची तरतूद मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते . पुन्हा कधी