नेताजींचे सहवासात - 4 - अंतिम भाग

  • 7k
  • 1.8k

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 नेताजींचे सहवासात पुढील उरलेला भाग 3 (आ)– ‘निवासातील नोकरवर्ग’ वाचकांच्या प्रतिसादानंतर भाग 3 (आ) - नेताजी निवास सिंगापूर वास्तव्यातील निवासातील नोकरवर्ग बर्लिनहून नेताजींबरोबर आलेले श्री स्वामी व हसन सुमारे दीड वर्षापर्यंत नेताजींचे चिटणीस म्हणून काम पहात. शिवाय स्वातंत्र्य सैनिकातून श्री रावत हे गढवाली ग्रहस्थ लष्करी सहायक म्हणून दिमतीस दिलेले होते. एक शीख ग्रहस्थ श्री समशेरसिंग व एक चाळीशी उलटलेले गुरखा सुभेदार, नेताजींचे अंगरक्षक म्हणून काम करीत. जपानी भाषा व अथवा व्यक्तींशी संबंध आणणारी सर्व कामे सुलभतेने व्हावीत म्हणून एका उच्च सरदार कुळातील श्री कोबायाशी हे जपानी तरूण नेताजींच्या दिमती हजर असत.