झाड आहे साक्षीला

  • 3.6k
  • 1.5k

अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे वाटे ठरलेलें असायचे, अगदी वरच्यापासून खालच्यापर्यंत. त्या रस्त्यावरच्या काळवंडलेल्या धूरात नुसता पैसा दिसायचा त्याला, कामावरुन सुटटी अशी कधी घेतलीच नाही, सतत आपलं ट्रॉफिक, अपघात, रस्ते, हप्ते, जमवलेले पैसे, त्यांचे हिशोब, जमीन-जुमला, पैसा, व्हवहार यातचं डोकं आणि मन गुतंलेलं. कुंटूबासाठी तो पार ‘वाल्या’ कोळीच होता. माया, वेळ,