मोहमयी माया

  • 5.9k
  • 2.5k

* मोहमयी माया * डॉ रश्मी! नावाजलेल्या स्त्री रोग तज्ज्ञ! त्या मोठ्या शहरात मध्यवती ठिकाणी त्यांचा भव्य असा दवाखाना होता. दुरवरून अनेक स्त्रिया त्यांच्या दवाखान्यात येत असत. अत्यंत हुशार डॉक्टर अशी त्यांची सर्वदूर ख्याती होती. त्यादिवशीही डॉ रश्मी दवाखान्यात नेहमीप्रमाणे येणाऱ्या आजारी व्यक्तींना तपासत होत्या, योग्य मार्गदर्शन करीत होत्या, औषधोपचार लिहून देताना योग्य त्या सूचना करीत असताना साधारण पंचवीस वर्षे वयाचे जोडपे आत आले. दोघेही लाजत, बुजत आत आले. डॉक्टरांनी त्यांचे नेहमीप्रमाणे हसून स्वागत केले. ते जोडपे खुर्चीवर बसेपर्यंत डॉक्टरांनी त्यांचे निरीक्षण केले. जोडपे ग्रामीण भागातील होते. मुलाने