प्रेम हे..! - 1

(33)
  • 32.9k
  • 4
  • 13.1k

प्रेम हे..!! (भाग 1) "निहू किती वेळ...?? चल आवर लवकर.. एव्हाना झुंबड उडाली असेल कॉलेज वर..? रीतू आणि अदिती पण कधीच्या थांबल्या आहेत कॉलेज जवळच्या स्टॉप वर.. मघाशीच फोन येऊन गेला त्यांचा.... शिव्या पडणार आहेत आता आपल्याला..?" अवनी जरा वैतागून दारातूनच निहीरा ला म्हणाली.. "chill यार अवनी...अगं नेमकं आजच उठायला उशीर झाला.. म्हणून उशीर होतोय... सॉरी ना! आणि तसही लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का.. ?.. बघ दहा मिनिटांत तुला पोहोचवते की नाही कॉलेज मध्ये ?" निहिरा घरातून बाहेर पडता पडता म्हणाली.. "वर नको पोहोचवू म्हणजे झालं??" अवनी अजून वैतागलेलीच होती.. "बस क्या यार... चल बस आता लवकर!" निहिरा