अघटीत - भाग-४

(25)
  • 23k
  • 2
  • 12.9k

अघटीत भाग ४ हल्ली त्या तिघी मैत्रिणी शिवानीच्या गाडीतून कॉलेजमध्ये जात व इतर वेळी पण गाडीतुन एकत्र भटकत असत .पण तिची मैत्रीण गाडी घेऊन घेई न्यायला आली आहे हे क्षिप्राच्या घरी पटले नसते . शिवाय बाबाने जर असे काही पाहीले असते तर नक्कीच अनेक प्रश्न विचारल असते . म्हणून मग ती नेहेमी प्रमाणे घरून रीक्षाने निघत असे व कोपर्या पर्यंत जाऊन रीक्षा सोडुन देत असे . तिथे शिवानी आणि नायरा तिची वाट पाहत असत ..मग तिघी एकत्र निघत . तिच्या उशिरा कॉलेजला जाण्यावरून आईने पण एकदोन वेळेस तिला टोकले होते . पण तिने अशीच उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली