अघटीत - भाग ६

(40.7k)
  • 21.3k
  • 3
  • 11k

अघटीत भाग ६ खरेतर पद्मनाभच्या आईला क्षिप्रा मधला फरक स्पष्ट दिसत होता . पोरगी वेळी अवेळी घरी येत असते, अभ्यास करताना कधीच दिसत नसे आणि सतत मोबाईलवर असे हे जाणवत होते . तिच्या मैत्रिणी पण जरा अति आगावू आहेत . कसले कसले कपडे घालते ही पोरगी आणि विचारले की उत्तर ही नीट देत नाही हे ही त्यांना समजले होते .यापूर्वी त्यांची आणि क्षिप्राची चांगली गट्टी असायची. मनातले सगळे ती आई बाबाच्या आधी आजीला सांगत असे . दोघी एकत्र जेवत एकत्र झोपत .. एकमेकीत छान छान गमती शेअर करीत पण आजकाल ती गंमत ही संपली होती. तिचा वेळेत घरी यायचा पत्ता