कोड - The Story of leukoderma  Girl….. 

  • 7.7k
  • 3k

कोड The Story of leukoderma Girl….. पहाटेलाच जाग आलेली, बेडवरून उठून डोळयावरून पाणी शिंपडलं, नैपकीनने हलकेच चेहरा पुसत असतांना पुनश्च तीचं लक्ष स्वतःच्या चेहऱ्याकडे गेलं. ती स्वतःचा चेहरा व हात निरखत राहिली. होय अगदी बालवयापासून तीला कोड झालेलं. ती अगदी खिन्न झाली, स्वतःच्या चेहऱ्याचीच तीला किळस येवू लागलेली. तीचं मन रडवेलं झालं. तीने अलगद टुथपेस्ट हातात घेत ब्रशला लावलं आणि तोंडात घालत ती दारातून बाहेर आली.... ती बराच वेळ विचार करीत ब्रश करीत होती. समोरची टेकडी, निसर्गरम्य परीसरातील झुळूक वारा आणि त्यातील मनमोहकता मनाला थोडीशी तरलता देवून गेलेली. या निसर्गानेच तीला आता कुठं जीवन